SBI PO Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी 2024 साठी अधिकृत भरती (SBI PO Recruitment 2024) अधिसूचना जारी केली आहे. देशातील प्रतिष्ठित बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळवायची असेल तर ही सुवर्णसंधी गमावू नका! या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 27 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे.
SBI PO Recruitment 2024: भरतीविषयी मुख्य माहिती
माहिती | तपशील |
---|---|
भरती प्रक्रिया सुरु | 27 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 जानेवारी 2024 |
पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र | फेब्रुवारी 2025 च्या 3ऱ्या किंवा 4ऱ्या आठवड्यात |
पूर्व परीक्षा | 8 मार्च व 15 मार्च 2025 |
रिक्त पदांची माहिती (SBI PO Recruitment 2024)
- नियमित पदे: 586
- बॅकलॉग पदे: 14
- एकूण पदे: 600
पात्रता निकष
- शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात, परंतु मुलाखतीसाठी बोलावले गेल्यास 30 एप्रिल 2025 पूर्वी पदवी पूर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
- वय मर्यादा:
- किमान वय: 21 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
- उमेदवाराचा जन्म 02 एप्रिल 1994 आणि 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असावा.
AAI Junior Assistant Recruitment 2024: १० वी १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल:
- प्रारंभिक परीक्षा (Phase-I):
- 100 गुणांसाठी ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट.
- मुख्य परीक्षा (Phase-II):
- 200 गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 50 गुणांसाठी वर्णनात्मक चाचणी.
- मनोवैज्ञानिक चाचणी व मुलाखत (Phase-III):
- ग्रुप एक्सरसाईज व वैयक्तिक मुलाखतीसह व्यक्तिमत्व चाचणी.
अर्ज शुल्क
- सामान्य, EWS, OBC: ₹750/-
- SC/ST/PwBD: शुल्क नाही
- अर्ज शुल्क परतफेड होणार नाही.
अर्ज कसा करावा?
- SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- “SBI PO Recruitment 2024” लिंकवर क्लिक करा.
- आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरून अर्ज सादर करा.
SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO Recruitment 2024) होण्याची संधी सोडू नका. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारी सुरू करा!